InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना जामीन

- Advertisement -

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची हाय कोर्टातून जामीन मिळाला आहे.  चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणात अर्धी शिक्षा भोगून झाल्याचे सांगत लालू यांच्या पक्षाकडून जामीन अर्ज करण्यात आला होता. यावर सुनावनी करताना रांची हायकोर्टाने लालू यादवांना 50-50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला. मात्र चाईबासा-दुमका कोषागार प्रकरणी त्यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.

एका प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या सुनावणीदरम्यान कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चाईबासा-दुमका कोषागार प्रकरणी त्यांना अजूनही जामीन मिळू शकलेला नाही. यामुळे त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे. आता ते आपल्या वकीलांमार्फत देवघर कोषागार प्रकरणात मिळालेल्या जामीनाचा आधार घेऊन दुमका-चाईबासा कोषागार प्रकरणात जामीनासाठी याचिका दाखल करु शकतात.

Loading...

- Advertisement -

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.