सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अटक सिद्धार्थ पिठानीचा जमीन मंजूर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी गेल्या महिन्यातच एनसीबीने कारवाई करत सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरु असताना सिद्धार्थचं नाव समोर आल्याने एनसीबीने सिद्धार्थला अटक केली. 26 जूनला सिद्धार्थचं लग्न असल्याने त्याने लग्नासाठी कोर्टाकडे जामिनाची मागणी केली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थला 10 दिवसांचा जामीन मंजूर झाला आहे. लग्न समारंभासाठी त्याला हा जामीन मंजूर करण्यात आलाय. या शिवाय सिद्धार्थने २ जुलैला सरेंडर होण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

एनसीबीकडून समन्स पाठवून देखील त्याला कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हैदराबादमधून सिद्धार्थला अटक करण्याक आली होती. सिद्धार्थच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा तपास केला गेला आणि त्याला अटक करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा