‘घटस्फोटीत महिलांना देखील फिजिकल…’, लारा दत्ताची मुलाखत चर्चेत

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता आता लवकरच ‘हिकअप्स अँड हुकअप्स’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने कॅज्युल सेक्स, डेटिंग अॅप अशा अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे.

लाराने मुलाखतीमध्ये तिला ‘समाज घटस्फोटीत महिलांना किंवा सिंगल मदर यांना शारिरिक व भावनिक आधाराची गरज नसते असे समजले जाते त्यावर तुझं काय मत आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर लाराने दिलेल्या उत्तराने सर्वांची लक्ष वेधून घेतले आहे.

‘माझ्यापेक्षा अप्रतिम अभिनेत्री आहेत. त्यामध्ये रत्ना पाठव यांचा ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट आहे आणि त्यांची भूमिका काय अप्रतिम होती. म्हाताऱ्या झाल्यानंतरही त्यांचे काही फिजिकल डिझायर असतात. पण आपल्याकडे महिला म्हातारी झाली की तिचे फिजिकल डिझायर नसतात असे म्हटले जाते. एक महिला असल्यामुळे हे सर्व असत्य असल्याचे मला माहितीये’ असे लारा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘पतीने किंवा इतर कुणी जर आम्हाला सेक्सी दिसत असल्याचे सांगितले तर फार चांगले वाटते आणि त्यात गैर असे काही नाहीये. समाजाने आपण करत असलेला विचार चुकीचा आहे हेच सांगितले आहे. वसु या माझ्या भूमिकेने मी अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणार आहे. मी साकारत असलेली वसु ही एक अशी महिला आहे जिने लग्नाच्या १९ वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर ती पहिल्यांदाच कुणाला तरी डेट करायला जाते. त्यामुळे तिला भीती वाटते आणि इतर काही गोष्टींची तिला दडपण येते.’

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा