InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘शेवटच्या क्षणी चित्र पालटलं, निवडणुकीच्या एक दिवस आधी मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला’

- Advertisement -

मतदान पार पडल्यानंतर उत्सुकता असेल ती लोकसभेच्या निकालाची. कोण बाजी मारणार? सत्ता कुणाची येणार?  हे चित्र 23 मे रोजी स्पष्ट होईल. पण, राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाला दिल्लीत किती जागा मिळणार? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सात जागा जिंकण्याबाबत आम्ही आशावादी होतो. पण, शेवटच्या क्षणी चित्र पालटलं. कारण, निवडणुकीच्या एक दिवस अगोदर मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला. त्यांची संख्या ही 12 ते 13 टक्के आहे. त्याचा परिणाम हा निकालावर दिसून येईल असं केजरीवाल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्पष्ट केलं.

यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येणार का? असा सवाल देखील अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ईव्हीएमशी छेडछाड न झाल्यास भाजप पुन्हा सत्तेत येणं कठिण असल्याचं म्हटलं आहे.

Loading...

- Advertisement -

शिवाय, नरेंद्र मोदी – अमित शहा यांच्याशिवाय सत्ता स्थापन करण्यास कुणी पुढे आल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.