Lava Blaze 5G Launch | Lava ने केला सर्वात स्वस्त 5G मोबाईल लाँच
टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक मोबाईल (Mobile) कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह आपले मोबाईल बाजारात लाँच करत असते. अशा परिस्थितीमध्ये मोबाईल उत्पादक कंपनी लावा (Lava) ने आपला नवीन मोबाईल Lava Blaze 5G लाँच केला आहे. लावाने लाँच केलेला हा मोबाईल सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. Lava Blaze 5G हा स्मार्टफोन बाजारामध्ये चांगल्या कॅमेरा क्वालिटीसह लाँच करण्यात आलेला आहे. लावाने लाँच केलेला हा स्मार्टफोन सॅमसंग (Samsung), ओपो (Oppo) च्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या 5G मोबाईल सोबत स्पर्धा करू शकेल.
Lava Blaze 5G फीचर्स
Lava Blaze 5G हा मोबाईल MediaTek Dimensity 700 चीफ सेटसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये 6.5 इंच एलईडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले, तर या फोनमध्ये 50MP कॅमेरा असून 3GB व्हर्च्युअल रॅम उपलब्ध आहे. तरी या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाले, तर या फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. ज्या फोन मध्ये 4GB रॅम असून 128GB इंटरनल स्टोरेज क्षमता आहे.
याशिवाय स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी पर्याय म्हणून WiFi, Bluetooth, GPS आणि USB Type-C इत्यादी फीचर्स देखील देण्यात आलेले आहे. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो.
किंमत
लावाने लाँच केलेला हा 5G स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या अविकृत वेबसाईटवर 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या मोबाईलच्या किमतीमध्ये कधीही डिस्काउंट ऑफर केली जाऊ शकते. पण त्या डिस्काउंट बद्दल अजूनही कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- Aaditya Thackeray | राज्यात बंटी-बबली खूप झालेत, आदित्य ठाकरेंची राणा दाम्पत्यावर टीका
- Navneet Rana | तुम्ही मॅनेज झालेत का?, नवनीत राणांवर कारवाई का नाही?, कोर्टाचा पोलिसांवर संताप
- Devendra Fadanvis | “मराठा समाजासाठी…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचं मोठं विधान
- Gulabrao Patil | महिला शिवसैनिकांकडून गुलाबराव पाटलांच्या पोस्टरला चप्पलांचा मार, शिवसेना भवनाबाहेर आंदोलन
- Bipasha Basu | आलिया भटच्या पाठोपाठ बिपाशा बसू ही लवकरच देणार गुडन्यूज
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.