लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे . मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. लावणी सम्राज्ञी तसेच आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

१६ तारखेला मुंबई येथे त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांनी अनेकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आतापर्यंत आपण कलेची सेवा केली. आता राजकारणात येऊ आपल्याला कलाकरांसह महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे

दरम्यान, मराठी मातीतील लावणीला परदेशातही मानाचे स्थान सुरेखा ताईंनी मिळवून दिली सुरेखा ताईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. सुरेखा ताईंचे वडील हमालीचे काम करत असत. वाईट परिस्थीतीवर मात करत आज सुरेखा पुणेकरांनी महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.शाळेची पायरीही न चढलेल्या सुरेखाताईंनी वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधले. बैलागाडीचा तमाशा आणि पारावरच्या तमाशापासून त्यांनी लावणीची सुरुवात केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा