Laxman Jagtap | लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन

Laxman Jagtap | पुणे: पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. कर्करोगामुळे त्यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मध्यंतरी अमेरिकेहून इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवली होती. इंजेक्शन घेतल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप खुर्चीत बसून काही पावले चालू शकत होते. त्यानंतर ते मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र, आज दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे, ते म्हणाले आहेत,”चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना.”

पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रिय नेते म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवड महानगर पासूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. गेल्या महिन्यामध्ये आमदार मुक्ता टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला. तर, आज लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

महत्वाच्या बातम्या