InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लक्ष्मण माने राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक- गोपीचंद पडळकर

विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हं निर्माण झाली आहे. आघाडीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये जबरदस्त जुंपली असून या दोघांमधील शाब्दीक युद्ध हे पराकोटीला पोहोचले आहे. वंचित बहुजन आघाडीतील ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी वंचितचे सरचिटणीव गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचा आरोप केला. या आरोपांना उत्तर देताना पडळकर यांनी माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा उलट आरोप केला आहे.

पडळकरांचे हे आरोप ऐकल्यानंतर संतापलेल्या लक्ष्मण माने यांनी ‘आम्ही वंचित बहुजन आघाडीसाठी राज्यभर फिरलोय, तुम्ही आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आले आहात, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात’ अशा तिखट शब्दात पडळकरांवर शाब्दीक हल्ला चढवला. यावर पडळकर यांनी पुन्हा एकदा माने यांना सवाल विचारला की ‘मी तुम्हाला नाव सुचवायला सांगितलं होतं का ?

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply