“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

नांदेड : सध्या राज्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक खूप चर्चेचा विषय बनलाय. भाजप विरुद्ध कॉग्रेस असा हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही पक्षांसाठी आता हि निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. याच दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेतून नागरिकांना दिलेल्या ऑफरची भलतीच चर्चा सुरु आहे. यावेळी ते देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक पूर्वतयारीसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यापुर्वी सांगली महानगरपालिकेच्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला शॉक दिल्यास सोन्याचा मुकुट घालेन अशी ऑफर दिली होती. तर आता देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास मी तुम्हाला गाव जेवण देईन अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ही ऑफर दिली आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गावजेवणाची ऑफर देताना म्हटले की, भाजपला इथून आघाडी मिळाल्यावर केवळ गावजेवणच दिले जाणार नाही. तर मी स्वत: या ठिकाणी गावजेणात सहभागी होईल. चंद्रकांत पाटील यांच्या या ऑफरचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायदा होतो हे निकालानंतरच कळणार आहे. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने जोरदार ताकद लावली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा