InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘वंचित’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी – रामदास आठवले

- Advertisement -

‘वंचित आघाडी’मुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

लोक कॉँग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात दोन्ही कॉँग्रेसना भवितव्य नसल्याने शरद पवार यांनी ‘एनडीए’मध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

‘वंचित आघाडी’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी असल्याचा आरोप करून आठवले म्हणाले, काही ठिकाणी उमेदवाराचीच ताकद जास्त असल्याने त्यांनी मते खाल्ली. त्यामध्ये ‘वंचित’च्या प्रभावाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी आता ‘एनडीए’सोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही.

विधानसभेला १८ पैकी १० जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात, विस्तारावेळी मंत्रिपद मिळावे, ५० कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान मिळावे, या आपल्या मागण्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.