InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सात दिवसात सरकारी निवासस्थान सोडा, केंद्र सरकारची माजी खासदारांना तंबी

केंद्र सरकारने सर्व माजी खासदारांना सरकारी निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. घर सोडण्यासाठी माजी खासदारांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शासकीय निवास न सोडल्यास वीज आणि पाण्याची जोडणी कापण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भाजपच नाही, तर इतर पक्षांचे धरुन दोनशेहून अधिक माजी खासदार आपल्या सरकारी निवासस्थानात राहतात. या लोकप्रतिनिधींना 2014 मध्ये खासदारपदी निवडून आल्यानंतर बंगले देण्यात आले होते. मात्र खासदारकी गमावल्यानंतरही त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. अशा खासरादांना आता थेट केंद्र सरकारकडून इशारा देण्यात आला आहे.

Loading...

माजी खासदारांना सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये घर सोडले नाही तर पुढच्या तीन दिवसांमध्ये वीज आणि पाण्याची जोडणी कापण्याचे आदेश दिल्याची माहिती हाऊसिंग कमिटीचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.