मौन सोडा आणि जनतेसाठी बोला ; प्रियांका गांधींची मोदींवर टीका

‘आज देशातील जनता त्रस्त आहे. शेकडो मजूर पायी प्रवास करत आहे. श्रमिक रेल्वेत मजुरांचा मृत्यू होत आहेत. आपली भारत माता रडत आहे आणि तुम्ही मौन धारण करून बसला आहात. तुम्ही काहीच बोलत नाही आणि समोरही मदतीसाठी येत नाही’ असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसंच, ातील नेत्यांनाही अशा परिस्थितीत राजकारण करू नये, असं आवाहन केलं आहे.

प्रियांका चोप्राच्या पतीवर ‘ही’ अभिनेत्री फिदा

काँग्रेसने आज देशभरात #SpeakUpIndia या मोहिमेखाली मोदी सरकारविरोधात अभिनव आंदोलन केलं. यावेळी प्रियांका गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारची जोरदार पाठराखण करत भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहे.

प्रियांका गांधींनी मान्य केली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. सरकार कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पण, भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार पाडण्याचा डाव आखला जात आहे. सध्या राजकारण करण्याची वेळ नाही. देशातील जनतेचं आपल्यावर ऋण आहे. त्यांच्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे’ असं आवाहन प्रियांका गांधींनी भाजप नेत्यांना केलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.