‘चोराला सोडून संन्याशाला फाशी देताय’; मेघा धाडेने व्यक्त केला संताप

मुंबई : नवाब मलिक आणि समीर वानखेडे वाद आता चांगलाच पेटला असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून राजकीय वातावरणात देखील खळबळ उडाली आहे. आज नवाब मलिक यांनी एक पत्र सादर करत समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यादरम्यान क्रांती रेडकरला अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार क्रांतीला पाठिंबा दिला आहे. यातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेने क्रांती आणि समीर वानखेडे यांना पाठिंबा देत एक व्हिडीओ पोस्ट केली आहे.

मेघाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर प्रतिक्रिया दिली आहे. यात ती म्हणाली की, “नमस्कार, मी मेघा धाडे. मी आज मनोरंजन विश्वातील कोणतीही माहिती देण्यासाठी आलेली नाही. तर आज मला जाणून घ्यायचं आहे की, आपल्याला नक्की कसा समाज हवा आहे? एक व्यक्ती जिथे तो सत्यासाठी उभा आहे. ती व्यक्ती समाजातील वाईट प्रवृत्तींना संपवण्याचा प्रयत्न करतेय, पण वाईट प्रवृत्ती असलेले काही समाजकंटक त्याच्या मागे लागले आहेत. त्याचा मानसिक छळ करत आहेत. त्याच्या कर्तव्य दक्षतेवर, चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. अशा समाजात आपण स्वत:ही सुरक्षित नाही. जे न्यायाची, आपली सुरक्षा करतायत, त्यांच्याच वाट्याला एवढी विटंबना येत असेल तर या समाजात सामान्य माणूस कसा जगेल? एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न खूप संताप आणणारा आहे”, असं ती म्हणाली.

पुढे मेघा म्हणाली, “आता मी त्यांच्या वडिलांचा व्हिडीओ पाहिला. त्यात ते त्यांची जात, धर्म यांचं प्रमाणपत्र दाखवत होते. मला या गोष्टींचा फार संताप येतोय. तुम्ही चोराला सोडून संन्याशाला फाशी देत आहात. जे समाजकंटक हे सगळं करतायत ते कोण आहेत, हे न समजण्याइतके आपण नासमज नाही. जे लोक या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये आहेत, ते मुद्दाम या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. जात, धर्म, लग्न, दिवंगत आईचा धर्म या सगळ्या गोष्टी उकरून काढून वानखेडेंना त्रास दिला जातोय. मला सांगा एवढा मोठा अधिकारी फक्त ८ कोटींच्या खंडणीसाठी असं करेल का? खंडणी हा शब्द त्यांच्याशी जोडलं जाणंच चुकीचं आहे. अशा ऑफिसरवर असे आरोप करण्यात येत असतील तर आपल्यासारख्या लोकांनचं काय?”, असे देखील ती म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा