Lemon Benefits | टीम कृषीनामा: लिंबू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण लिंबाला विटामिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. विटामिन सी सोबतच लिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. लिंबामध्ये विटामिन ए, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि फोलेट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. लिंबामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळून येते. त्यामुळे लिंबाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर लिंबाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity – Lemon Benefits)
लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट आढळून येतात. हे घटक शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. लिंबाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला, फ्लू इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. या मिश्रणाचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी खोकल्यापासून दूर राहू शकतात.
हृदयासाठी फायदेशीर (Beneficial for the heart – Lemon Benefits)
लिंबामध्ये आढळून येणारे पोषक घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. लिंबाच्या नियमित सेवनाने हृदयविकार आणि स्ट्रोक टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे हृदयविकाराचा धोका टळू शकतो. त्यामुळे नियमित लिंबाचे सेवन हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते.
वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control – Lemon Benefits)
तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात लिंबाचा समावेश केला पाहिजे. लिंबामध्ये असे काही पोषक घटक आढळतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर कोमट पाण्यामध्ये लिंबू मिसळून त्याचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते.
त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin – Lemon Benefits)
लिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर लिंबाच्या नियमित वापराने त्वचेवरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात. लिंबाच्या नियमित सेवनाने त्वचा निरोगी राहू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या