अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, आम्ही आणखी उजळ माथ्याने समोर येऊ

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. भुजबळ यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण याप्रकरणी हायकोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे. यावर भुजबळांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीतला एक शेरही म्हटला. मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ, जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला. परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता तर अधिकच अडचणीत टाकलं. त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू. आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही. दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा