“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

मुंबई : राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले आहेत. या मुद्यावर महाविकासाआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. यावर आता भाजपा नेते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

तसरच यानंतर पुढे भातखळकर म्हणाले कि, सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भातखळकरांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यामुळे अतुल भातखळकरांच्या टीकेला शिवसेना प्रत्युत्तर देणं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा