“चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि कोरोना महामारीविरुद्ध लढूया!” म्हणत शरद पवारांनी केलं ममता दिदींचे अभिनंदन

पश्चिम बंगालमध्ये भाजपला धोबीपछाड देत तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं जोरदार मसुंडी मारली आहे. तृणमूलने केलेल्या कामगिरीवर ‘जबरदस्त विजय’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ममतांचं अभिनंदन केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं भाजपाला शंभरीच्या आत रोखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत संपूर्ण शक्ती पणाला लावला होता. मात्र, तरीही भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. अंतिम निकाल येणं अद्याप बाकी असले, तरी निकालाचं एकूण चित्र स्पष्ट झालं आहे. तृणमूल काँग्रेस दणदणीत विजय मिळवताना दिसत आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. “जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि करोना महामारीविरुद्ध लढा देण्याचं काम एकजुटीने करू,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा