LIC Job | नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
LIC Job | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 9394 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांमध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाचा समावेश आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवार 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
एलआयसीच्या या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेमध्ये वय वर्ष 21 ते वय वर्ष 30 पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागणार आहेत. तर, SC/ST श्रेणीतील उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
एलआयसी यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 21 जानेवारी 2023 पासून ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ | “तुमच्याकडे कितीही अनुभव असला तरी…” ; वसीम जाफर यांचा विराट-रोहितला मोलाचा सल्ला
- Kidneys Infection | किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर रामबाण इलाज ठरू शकतात ‘हे’ घरगुती उपाय
- KL Rahul & Athiya Shetty | सजला केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचा मंडप, पाहा VIDEO
- MPSC Recruitment | MPSC मेगा भरती! लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- CNG Cars | लवकरच लाँच होऊ शकतात ‘या’ लोकप्रिय कार्सचे सीएनजी व्हर्जन
Comments are closed.