InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

- Advertisement -

माऊलींच्या प्रस्थानादरम्यान मानाच्या ४७ दिंड्यांतील प्रत्येक दिंडीतील वारकरी भाविकांच्या प्रवेशावर मर्यादा आणण्यास आळंदी भक्त निवासात सोमवारी बैठक झाली.

- Advertisement -

मंदिराचे क्षेत्रफळ आणि सोहळ्यास दिंड्यातून मंदिरात प्रवेश करणारे वारक-यांची संख्या मोठी असल्याने यावर निर्णय ही सभा झाली. दिंडीकरी यांची संख्या मर्यादित ठेवण्यास पोलीस आणि महसूल प्रशासनाने सुचविले. दिंडीतील संख्या निर्धारित करण्यासाठी प्रशासनाने सुवर्णमध्ये साधण्यासाठी १०० संख्या जास्तीत जास्त असावी मात्र यापेक्षा जास्त संख्या असू नये असा सूर या बैठकीत प्रशासनाकडून निघाला. यामुळे सोहळ्याआधीच गर्दीचा अंदाज येणार असल्याने प्रस्थान सोहळा निर्विघ्न होण्यास मदत होईल अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.  मंदिरात प्रस्थानला प्रवेशाचे पास घेण्यास बैठकीत दिंड्याच्या प्रमुखांनी नकार दर्शविला. पोलिसांनी केलेले पास देण्याचे आवाहन फेटाळून लावले.

आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात झालेल्या समन्वय बैठकीस पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, तहसीलदार सुचित्रा आमले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविन्द्र चौधर, विवेक लावंड, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी नगरपरिषद अधिक्षक किशोर तरकसे, अशोक राजगुरू आदी सह माऊलींच्या पालखीसोहळ्यातील दिंडी प्रमुख उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.