Lip Care Tips | फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, तर ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होताच आपल्या त्वचेवरचे Skin प्रॉब्लेम्स वाढू लागते. त्याचबरोबर हिवाळा सुरू होताच वडीलधाऱ्या लोकांपासून लहान मुलापर्यंत सर्वांना फाटलेल्या ओठांचा Lip Care त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत ऋतू बदलत असताना आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण जर आपण त्वचेची काळजी नाही घेतली तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि ओठांवर दिसून येतो. कोरड्या ओठांमुळे चेहऱ्यावरचे आकर्षण तर कमीच होते पण त्याचबरोबर वेदनाही वाढतात. फाटलेले ओठ हे चेहऱ्यावर एखाद्या डागासारखे दिसतात. हिवाळ्यात काही वेळा ओठ इतकी कोरडे पडतात की त्यामुळे आजूबाजूची त्वचा ही फाटायला लागते. म्हणूनच आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला हिवाळ्यामध्ये ओठांची काळजी कशी घ्यावी याच्या काही घरगुती टिप्स सांगणार आहोत.

थंडीमध्ये ओठ Lip निरोगी ठेवण्यासाठी पुढील घरगुती उपाय करा

खोबरेल तेल

खोबऱ्याचे तेल हे फाटलेले ओठ बरे करण्यासाठी एक रामबाण इलाज ठरू शकते. हिवाळ्यात बरेचसे लोक त्वचेवर खोबरे तेल लावतात पण त्याच्यासोबत ओठांवर खोबरेल तेल लावल्यास ओठांच्या अनेक समस्या दूर होतील. खोबरेल तेल दिवसातून दोन-तीन वेळा लावल्याने तुमचे ओठ मऊ बनू शकतात.

क्रीम

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या क्रीम मधून तुम्ही तुमच्या ओठांना सूट होईल अशी एखादी क्रीम निवडून ती दररोज तुमच्या ओठांना लावू शकतात. क्रीम लावल्याने ओठ मऊ होऊ लागतात. दररोज झोपण्यापूर्वी ओठांना क्रीम लावून त्याची मसाज करा. नियमितपणे क्रीम लावल्यावर तुम्हाला फाटलेले ओठांचा सामना करवा लागणार नाही.

मध

ज्या लोकांना ओठ फटण्याची समस्या जास्त प्रमाणात असते त्यांनी आपल्या ओठावर मध लावावा. मग तुमचे फाटलेले ओठ बरे करण्यास मदत करून त्यांना मऊ देखील करते. मधामुळे ओठांना पुरेसे मॉइश्चरायझर मिळते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.