InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ऐकावं ते नवलंच! मोबाईलच्या वापराने मानवी कवटीला शिंग

- Advertisement -

आजकाल मनुष्याला मोबाईलची सवय एवढी लागली आहे की मनुष्य मोबाईलशिवाय राहणं शक्यच होत नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे बंद होईपर्यंत मोबाइल काही सुटत नाही.

मोबाइलमुळे होणारे दुष्परिणाम अनेक उदाहरणातून ऐकले असतील, त्यातच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. Washington Post च्या एका रिपोर्टनुसार, आता माणसाच्या कवटीमध्ये शींग उगवत आहेत.

- Advertisement -

रिपोर्टनुसार, रिसर्चमध्ये आढळलं की, फोनच्या अत्याधिक वापरामुळे मनुष्यांच्या कवटीमध्ये शिंगासारखं काही उगवत आहे. पुढच्या बाजूने वाकून फोनचा वापर केला जात असल्याने  स्पाईनचं वजन डोक्याच्या मागच्या  मसल्सवर पडत आहे. त्यामुळे तेथील चामडी जाड होऊन तंतुग्रंथी (Callus) मध्ये बदलत आहे.

म्हणजेच हेच की, मानेच्या ठिक वरच्या बाजूला कवटीमध्ये शिंगांसारखं काही उगवत आहे. University of the Sunshine Coast, ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला. त्यांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्सचा अत्याधिक वापर केल्याने मनुष्यांना हा विकार होत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.