‘गाणं ऐकून माझ्या कानातून…’, नविन गाण्यामुळे ढिंच्यॅक पूजा ट्रोल

मुंबई : ‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून रातोरात प्रसिद्ध झालेली युट्युबर ढिंच्यॅक पूजा एक नवीन गाणं घेऊन आली आहे. ‘दिलोंका शूटर २.०’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यामुळे ढिंच्यॅक पूजा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

ढिंच्यॅक पूजाचे ‘दिलोंका शूटर २.०’ हे गाणे १५ ऑक्टोबर रोजी रिलिज झाले आहे. या गाण्यामध्ये ढिंच्यॅक पूजा गाडी चालवत गाणे गाताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला देखील काही मुले गाडीवर दिसत आहेत. ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर, मुझसा ना कोई क्यूटर’ असे या गाण्याचे बोल आहे. यूट्यूबवर हे गाणे आता पर्यंत जवळपास १ लाख ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

ढिंच्यॅक पूजाचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने ‘ढिंच्यॅक पूजाचे गाणे ऐकून माझ्या कानातून रक्त यायला लागले’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने ढिंच्यॅक पूजाची गाणी ही टोनी कक्करपेक्षा चांगली असतात असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा