‘काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत’; सर्वोच्च न्यायालयाचा परमबीर सिंगांना झटका

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण परमबीर सिंह यांच्याविरूद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत देखील गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

परमबीर सिंह त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणांनी प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंगांना कडक शब्दात फटकारलं आहे.

“तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही तब्बल 30 वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. मात्र आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे’, असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्या बँचसमोर हा सुनावणी चालू होती. तेव्हा न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत,” असं म्हणत परमबीर सिंग यांना चांगलंच फटकारलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा