स्थानिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज; ठाकरे,आंबेडकर यांची घेणार भेट

विरोधी पक्षातील छोटय़ा पक्षांनी सर्वानी एकत्र येऊन ही निवडणूक लढविणे आवश्यक आहे. त्यामुळे  राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांची भेट राजू शेट्टी घेणार  आहेत, असे त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

या सर्व नेत्यांबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र राहावे, अशी इच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या सव्वा लाखांहून अधिक मतांमुळे पराभव झाल्याचे सांगत शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांनी मते दिली पण ती यंत्रातून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर अविश्वास आहेच. तसे नसते तर बहुतांश मतदार संघांत पडलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये एवढी तफावत आढळली नसती. अलिकडेच ही आकडेवारी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर काढून टाकल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading...

शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. या वेळी ते शेतकऱ्यांवर विश्वास असून मतदान यंत्रावर विश्वास नाही, असे म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.