InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘बोलणारा देव मी आहे’, भाजप उमेदवाराचे वादग्रस्त विधान

भाजपचे सोलापूर मतदार संघाचे उमेदवार डाॅ जयसिध्देश्वर स्वामी हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. देव तुमच्याशी बोलणार. तुमचा देव मीच आहे. असे वादग्रस्त विधान जयसिध्देश्वर स्वामी यांनी केले आहे.

सिद्धेश्वर स्वामी म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवसात देवदर्शनाला जाऊ नका. देवाला गेलात तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव भेटणार नाही, भेटला तर तुमच्याशी बोलणार नाही, बोलला तर म्हणेल आल्या पावली पत जा. तुमचे पैसे खर्च होतील, परंतु समाधान मिळणार नाही. देवाला जा-देवीला जा, कुठेही जा, तुळजाभवानीला जा किंवा पंढरपूरला जा, तिथे देव भेटणार नाही, तो बोलणार नाही. पण बोलणारा देव मी आहे.”, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply