InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

राष्ट्रवादीने अहमदनगर मतदार संघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी हा निर्णय घेतला. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील असेही बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.