InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘…तरीही तुम्ही वाचू शकणार नाहीत’, राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घेऊन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. तुमच्या वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं., अशी टीका नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केली होती. आता यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

‘मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत., असे ट्विट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

राहुल गांधींनी ट्विट केले की, मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.