InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्रात ‘राज’ फॅक्टर फेल? महाआघाडीची महापिछाडी?

- Advertisement -

महाराष्ट्रात एनडीएला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निकालावरून राज ठाकरे फॅक्टर फारसा प्रभावी ठरला नसल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा फॅक्टर राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला फायदेशीर ठरेल अशी शक्यता होती. मात्र आतापर्यंत आलेल्या निकालात आघाडीला पुन्हा अपयशच आले आहे. भाजपला रोखण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना गर्दी देखील झाली. मात्र त्यांच्या सभांची गर्दी यावेळी देखील सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा फॅक्टर उपयोगी ठरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हाती येत असलेल्या मतमोजणीनुसार महाराष्ट्रात भाजप २२, शिवसेना १९, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.