InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. यासंबंधित वृत्त ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.