InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लोकसभेच्या पहिल्या दोन जागांचा निकाल जाहीर, दोनही जागा भाजपच्या खात्यात

लोकसभेच्या निवडणुकीत सर्व देशभरच भाजपला मोठी आघाडी आहे. पहिले दोन निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले असून त्या दोनही जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत.

गुजरातच्या राजकोटमधून भाजपचे मोहन कुंदरिया विजयी झालेत. तर राजस्थानच्या भिलवाडामध्ये सुभाष बहेडिया यांनी विजय मिळवला. या दोनही ठिकाणी भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे.

देशभर काँग्रेसची पिछेहाट होत असताना काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीत 7 हजार 600 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी या आघाडीवर आहेत. वायनाडमध्ये मात्र राहुल गांधी 40 हजार मतांनी आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.