InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपला किती जागा मिळणार? अमित शहांनी पहिल्यांदाच सांगितला नंबर!

लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबाबतचे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले आहेत. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.

‘या निवडणुकीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. आम्हाला स्वबळावर 300 पेक्षा जास्त जागा मिळतील. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनएडीएचं सरकार स्थापन केलं जाईल,’ असा दावा अमित शहा यांनी केला आहे.

‘त्यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी बैठका घ्याव्यात’

विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अमित शहा यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘त्यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी बैठका घ्याव्यात. कारण त्यांना विरोधी पक्षनेता बसवण्याएवढ्याही जागा मिळणार नाहीत.’

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.