InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

….. आणि माजी पंतप्रधान जाहीर कार्यक्रमात ढसाढसा रडू लागले

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी त्यांचे नातू  निखिल कुमारस्वामी यांना मंड्या  प्रज्वल यांना हसन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे देवेगौडा कुटूंबीयांवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरच देवेगौडा आपली प्रतिक्रिया देत असाताना, जाहीर कार्यक्रमात दैवेगोडा यांना रडू कोसळले.

यावर भाजपने टीका केली की, दैवेगोडा यांचे रडणे हे जनतेला वेड्यात काढणे आहे.  भाजपने ट्विट केले की, रडणे ही जरा कला मानली तर देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबियांनी यात प्राविण्य मिळवलेले आहे. आपल्या रडण्याच्या कलेने त्यांनी दशकांपासून जनतेला वेड्यात काढले. निवडणूकी पूर्वी दैवेगोडा कुटूंब रडत आहे. मात्र निवडणुकीनंतर जे लोकं या कुटूंबाला मतदान करतील ते रडतील.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply