माढा, पुणे, नागपूर या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाला होणार उशीर

लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रत्येकाला आपल्या मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. राज्यातील माढा, पुणे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल उशिराने हाती येणार आहेत. सर्वाधिक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने या लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक निकाल येण्यास विलंब होणार आहे.

दुसरीकडे  मात्र गडचिरोली-चिमूर दिंडोरी, सातारा, लातूर, नंदुरबार, अकोला या मतदारसंघांतील निवडणूक निकाल उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वप्रथम येथील निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या मतदार संघातील विजय उमेदवार सर्वात आधी गुलाल उधळणार आहे.

महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी हाती येण्याची शक्यता आहे. सुरवातीला 6 मतदार संघातील निकाल अंदाजे 1 वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.