काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सत्तार यांचे बंड शमले असून, त्यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला आहे.

सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. नाराज झालेल्या सत्तार यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसा मदत करणार का नाही हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा