नरेंद्र मोदींनी केलं विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोठं आवाहन

आगामी लोकसबा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाबरोबरच राजकीय पक्षांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. मतदारांचा टक्का वाढला की, निवडणूकींच्या जागांवर देखील त्याचा परिणाम होत असतो.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना ट्विट करत आवाहन केले आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, ‘राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि एम के स्टॅलिन यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो. जास्तीत जास्त मतदान होणे हे आपल्या लोकशाहीच्या रचनेसाठी चांगले आहे.’

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.