InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्री सर, तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये – पंकजा मुंडे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्या नंतर, बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनायक मेटे यांना म्हणाले की, जो बीडमध्ये भाजपसोबत तोच राज्यात महायुती सोबत असेल. त्यांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो भाजपसोबतही नाही.’  असा थेट इशाराच दिला.

यावर सभेत पंकजा मुंडे यांनी देखील विनायक मेटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांची शिकवण आहे मोडेन पण वाकणार नाही. हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. मी साष्टांग दंडवत घेईल, पण फक्त जनतेसमोर. बाकी कोणासमोर झुकणार नाही. मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये. असा सल्ला जाहीर सभेत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.