InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा सत्तेत आले तर तुमचं जगणं हराम करतील – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सातारा मतदारसंघात सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांदेखील लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मतदान करू नका. ते पुन्हा सत्ते आले तर तुमचं जगणं हराम करतील. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी आज सगळीकडे सभा घेऊन भारतीय सैनिकांच्या नावाने मत मागत आहेत. मात्र शहीद जवानांच्या नावाने मत मागायला लाज कशी वाटत नाही? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत नसताना तत्कालीन मनमोहन सिंह यांना दहशतवाद्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारत होते. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले. मात्र आज नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता आहे, मग देशावर दहशतवादी हल्ले कसे होतात? दहशतवादी देशात घुसतात कुठून? तुमच्या हातात पूर्ण सत्ता आहे, मग पुलवामा हल्ला झालाच कसा, असे प्रश्न राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विचारले.

मुघलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला महाराष्ट्र होता, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या विरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र पुढे का नसेल?, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply