InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जे जर्मनीत हिटलरने केले, तेच नरेंद्र मोदी 2014 पासून करण्याचा प्रयत्न करत आहेत – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिल्या टप्प्यातील अखेरची सभा रायगड येथे पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नोटबंदीवरून, शहिद जवानांवरून पंतप्रधान राजकारण करत असल्याची जोरदार टीका ठाकरे यांनी केली.

देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं होतं. पण या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि या गावात अनेकांचं बँक खातंही नाही, त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोख रकमेत होतात, असेही राज ठाकरे म्हणाले.

तसेच, राज ठाकरे म्हणाले की, जे जे 1930 मध्ये हिटलरने जर्मनीत करायचा प्रयत्न केला तोच सगळा प्रकार नरेंद्र मोदी 2014 पासून करायचा प्रयत्न करत आहेत. पण ते विसरले की सोशल मीडिया आता आहे जो तुम्हाला आरसा दाखवतो.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.