InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता ‘लावा ना व्हिडिओ’, मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना टोला

फिर एक बार मोदी सरकार येणार हे चित्र आता जवळपास निकालावरून स्पष्ट होत आहे. भाजपचे नेते आणि महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलंच फटकारून काढलं.

राज ठाकरे यांनी विष पसरवण्याचे काम केले होते. पण ते लोकांनी पचवले आहे. एक कपिल शर्माचा कॉमेडी शो होता, आता या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा कॉमेडी शो लोकांनी बघितला, अशी टीका महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचं हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना  झोपवलं आहे.

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 48 जागांचे कल

भाजप 23

शिवसेना 20

राष्ट्रवादी काँग्रेस 4

बहुजन विकास आघाडी MIM 1

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.