InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपच्या 303 खासदारांमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपने 303 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. असे असले तरी भाजपच्या 303 खासदारांमध्ये एकही मुस्लिम खासदाराचा समावेश नाही.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने 7 मुस्लिम खासदारांना उमेदवारी दिली होती. मात्र एकाही उमेदवाराचा विजय झालेला नाही.

मागील निवडणुकीची तुलना करता यंदा मुस्लिम खासदारांची संख्या वाढलेली आहे. 2014 मध्ये 23 मुस्लिम खासदार संसदेत गेले होते. तर यंदा 27 खासदार संसदेत गेले आहेत. महाराष्ट्रातून एकमेव मुस्लिम खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.