InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांचा पराभव

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.