InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्यात काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण राजीनामा देणार?

राज्यात काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण राजीनामा देणार का? अशा चर्चा आहेत. तर अशोक चव्हाण स्वत: प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हायकमांडकडे अशोक चव्हाण स्वत:च राजीनामा सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

महाराष्ट्रामध्ये भाजपने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याच पाश्वभूमिवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपने देशभर जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहे. नितीन गडकरी यांनीदेखील पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.