Loksabha Elections | लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला मिळणार ‘इतक्या’ जागा
Loksabha Elections | मुंबई: सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. तर आता मविआनंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट देखील तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांवर चर्चा करण्यात आली आहे.
2019 मध्ये शिवसेनेने ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्या 22 मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहे. शिवसेना शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहे. तर ठाकरे गटाकडे 5 खासदार आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात (Loksabha Elections) शिंदे गटाकडून कोण उमेदवार असेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
The seat allocation formula for the Lok Sabha elections was decided
आगामी लोकसभा (Loksabha Elections) निवडणुकीमध्ये 2019 प्रमाणे जागा वाटप होणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच शिवसेना 22 आणि भाजप 26 हा फॉर्म्युला कायम राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता शिंदे गट आणि भाजप रणनीती ठरवणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून (Loksabha Elections) गदारोळ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून सावधान जागा वाटपाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर ठाकरे गटाकडून 18 जागांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar | अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार – दीपक केसरकर
- 75 Rupees Coin | नव्या संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, जाणून घ्या सविस्तर
- Sanjay Raut | भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा म्हणजे शिंदे गट; संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र
- Mukesh Ambani | रिलायन्स कंपनीच्या नावे आता ‘ही’ चॉकलेट कंपनी, वाचा सविस्तर
- Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; आडनाव वादावर गौतमीची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OHekgT
Comments are closed.