आत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं, शिवसेनेचा विरोधकांना सल्ला

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मोठा पराभव स्विकारावा लागला. राज्यात देखील भाजप-सेना युतीचा 41 जागांवर विजय झाला तर आघाडीला केवळ 5 जागांवर विजय मिळाला. विरोधकांच्या या पराभवानंतर शिवसेनेने विरोधकांना आत्मचिंतनासाठी हिमालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसासाठी केदारनाथ येथे गेले तेव्हा त्यांची खिल्ली विरोधकांनी उडवली आता विरोधकांना अंगावर राख फासून हिमालयात जाण्याची वेळ आली आहे असाही खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून  लगावण्यात आला आहे.

विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे, आपल्यावर ही वेळ का आली याचा विचार करावा, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.