कार्तिक आर्यनचा फोटो पाहून जान्हवी म्हणते…

कार्तिकच्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली. आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारा कार्तिक हा सोशल मिडियावरही बराच अॅक्टीव्ह आहे. नुकताच त्याने इन्स्ताग्रामवर एक फोटो पोस्ट केला. हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.

नवीन वर्षामध्ये कार्तिकने पहिल्यांदाच स्वत:चा फोटो इन्स्ताग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक शर्टलेस आहे. या फोटोखालील कमेंट सेक्शन पाहिल्यावर याचा अंदाज येतोच. पण या कमेंट्समध्ये एक खास कमेंटही आहे ती कमेंट म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूरची.

जान्हवी ही कार्तिकबरोबर ‘दोस्ताना – २’ मध्ये झळकणार आहे. “मा दा लाडला बिघड गया,” असं जान्हवीने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. २००८ साली प्रदर्शित झालेल्या दोस्ताना या मूळ चित्रपटातील गाण्याच्या ओळी जान्हवीने पोस्ट केल्या आहेत. या चित्रपटामध्ये समलैंगिक संबंधांवर मजेशीर पद्धतीने भाष्य करण्यात आलं होतं. याच विषयाचा संदर्भ देत कार्तिकच्या फोटोवर जान्हवीने कमेंट केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.