लता दीदींचा ‘हा’ फोटो पाहून वाढेल चिंता…

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर तब्बल 28 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर रविवारी घरी परतल्या. या 28 दिवसांच्या उपचारानंतर आता लता दीदींचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांनीच यावर चिंता व्यक्त केली आहे.

गेली अनेक दशकं दीदींच्या आवाजामुळे अनेक पिढ्यांचं आयुष्य समृद्ध झालं. त्यामुळे लता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून देशभर प्रार्थना करण्यात येत होती. 90 वर्षांच्या दीदींवर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपाचर सुरू होते. दीदींची प्रकृती आता पूर्ण ठणठणीत झाली असून घरी आल्यानंतर त्यांनी अतिशय भावुक ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत.

दीदी म्हणाल्या, गेल्या 28 दिवसांपासून माझ्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मला न्यूमोनिया झाला होता. पूर्ण बरी झाल्यानंतरच घरी जावं असं डॉक्टरांनी सांगितं होतं. आज मी घरी आलेय. देवांचे, माई आणि बाबांचे आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांचं प्रेम यामुळेच मी बरी झाले. तुम्हा सगळ्यांचे आभार. ब्रीच कँडीमधले उपचार करणारे डॉक्टर हे देवासारखे धावून आलेत. इथला कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. त्या सगळ्यांचेही आभार. तुमचं प्रेम असचं राहू द्या असं ट्विटमध्ये दीदींनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.