InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हुबेहुब दिसते मलायका अरोरासारखी, पाहाच!

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये काल शनिवारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. वीकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिनाचे नाव जाहिर केले आणि हिनाची स्टेजवर धमाकेदार एन्टी झाली.

गत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या घरात मानसिक त्रास होत असल्याची शिवानीने तक्रार होती. ती बाहेर गेली आणि हिनाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.