परतीच्या पावसाने खरिप पिकांचे नुकसान

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पावसळ्यात कोरडे असलेले नदी नाले परतीच्या पावसाने ओसाडून वाहू लागल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशीरा आगमन केले त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. जो झाला तो ही पोळा सणानंतर उघडला होता. नवरात्रात शेतकर्‍यांना अपेक्षा होती पाऊस येईल मात्र तेव्हा आला नाही मात्र नुकताच या आठवड्यात परतीच्या  पावसाने जोरदार आगमन केले यंदा पाऊस सरासरी एतका पडतो की नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

मात्र या आठवड्यातील पावसाने सरासरी गाठली असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात नदी, नाल्यात पाणी आले नाही जे पाणी आले ते आटून गेले त्यामुळे सिंचन प्रकल्पात पाणीसाठा आला तर नाहीच उलट ही नाले कोरडी पडली होती . या पावसामुळे नदी व नाल्याना चांगले पाणी आले असून विशेष म्हणजे पहिल्यांदा पाणी ओसाडूंन वाहत आहे. या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ होणार आहे. यापुढे पावसांचा असाच चांगला जोर राहील्यास सिंचन प्रक्लपात पाणी जाण्यास मदत होणार आहे.सध्या सुरू असलेला पाऊस हा खरिपातील तूर या पिकासाठी पोषक ठरत आहे. तुरीची चांगली वाढ होत आहे.मध्यतंरी कोरडवाहू कापसांला पाण्यची गरज होती त्यावेळी परतीच्या पावसाने या कापसाला मदत झाली आहे.

Loading...

मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. खरिपातील कोरडवाहू शेतीतील कापूस फुटत आहे. बोंडे काळी पडत आहे आधीच या पावसामुळे कपासांचा दर्जा घसरला असतांना पुन्हा या पावसामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने हा कापूस शेतकर्‍यांना मातीमोल भावात विक्री करावी लागणार आहे.त्यामुळे बाजारभावात नुकसान सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. सोयबीनच्या काढणीच्या कामात व्यस्त असल्याने  ट्रॅक्टर मळणीयंत्र शेतात नेणे कठीण झाले आहे. खरिपांच्या काढणीबरोबर  काही शेतकर्‍यांनी रब्बीची ज्वारीची पेरणी केली आहे त्यांना हा पाऊस चांगला पोषक आहे. तर काही शेतकरी अजून  रब्बीच्या हंगामाच्या मशागतीच्या तयारीला लागला आहे परंतू पावसामुळे ङ्कशागत लांबणीवर पडल्याने गहू, हरभरा या पिकांची पेरणी लाबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.