म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घर

सामान्य लोकांना शहरांमध्ये परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून लवकरच नव्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. राज्यभरातील १४,२६१ घरांसाठी ही सोडत काढली जाईल.

यामध्ये पुण्यातील दोन हजार, नाशिकमधील ९२, औरंगाबादमधील १४८, नागपूरमधील ८९८, अमरावतीमधील १२०० आणि कोकणातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या ५३०० घरांचा समावेश आहे. याशिवाय, मुंबईत गिरणी कामगारांसाठीच्या ५०९० घरांसाठीही लॉटरी काढली जाणार आहे.

जून महिन्यातच ‘म्हाडा’कडून मुंबईतील २१७ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. यामध्ये  चेंबुरच्या सहकार नगरमधील १७०, तर मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ सदनिकांचा समावेश होता. या घरांसाठी तब्बल ६६ हजार जणांनी अर्ज केले होते.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.