Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिचं मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार
Love Jihad | भोपाळ: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावर एकीकडे वाद सुरू असताना, दुसरीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद (Love Jihad) चे प्रकरण समोर आले आहेत. अशात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी एका तरुणीला हा चित्रपट दाखवला होता. मात्र, त्यानंतर ही तरुणी मुस्लिम प्रियकरासोबत फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
Sadhvi Pragya advised her to stay away from Yusuf
भोपालमध्ये ही घटना घडली आहे. भोपालमधील बसेरा परिसरातील रागिनी (बदललेलं नाव) ही एक नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. या तरुणीचे युसुफ नावाच्या एका तरुणावर प्रेम होतं. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांनी तिला युसुफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर त्यांनी तिला ‘द केराला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट दाखवला होता.
‘द केराला स्टोरी’ (The Kerala Story) बघूनही रागिनी आपल्या मतावर ठाम होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले होते. मात्र, त्या लग्नापूर्वीच रागिनी घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. त्यानंतर युसूफ आणि रागिनीने लग्न केल्याची माहिती मिळाली. रागिनीच्या कुटुंबाने युसुफ विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, युसुफने रागिनीच्या नावावर बँकेतून कर्ज काढलं आहे. रागिनी आपल्या कष्टाच्या कमाईतून ते कर्ज फेडत असल्याचा आरोप रागिणीच्या कुटुंबाने युसुफवर केला आहे. मात्र, चौकशी दरम्यान मी माझ्या मर्जीने त्याच्या सोबतपळून गेले होते, असं रागिनीने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर
- Odisha Train Accident | रेल्वे अपघातात तब्बल 48 तास दिली मृत्यूला झुंज! अखेर मृत्यूच्या दारातून परतला तरुण
- Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज
- Odisha Train Accident | रेल्वे अपघातात हरवलं प्रेम! फुटलेल्या कोचजवळ सापडलं प्रेमपत्र
- Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43oyf8V
Comments are closed.